महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पंतप्रधानांचा नागपूर मेट्रो प्रवास असुरक्षित, मेट्रोला आवश्यक परवानगी नाही - पंतप्रधानांचा नागपूर दौरा

पंतप्रधान ज्या मेट्रोमधून प्रवास करतील त्यामध्ये अग्निरोधक यंत्र नाहीत. अनेक महत्त्वाच्या बाबींची परवानगी नसतानाही पंतप्रधानांची मेट्रो राईड घडवणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा मेट्रो प्रवास असुरक्षित आहे.

नागपूर मेट्रो

By

Published : Sep 5, 2019, 8:58 PM IST

नागपूर- येत्या 7 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी ते मेट्रोच्या १० किमी मार्गाचे लोकार्पण करणार आणि त्यानंतर मेट्रो प्रवासाचा आनंदही लुटणार आहेत. मात्र, नागपूर मेट्रोला अजूनही प्रवाशी वाहतुकीचे 'ना हरकत' प्रमाणपत्र मिळाले नाही. शिवाय मेट्रोमध्ये अग्निरोधक यंत्र नाहीत. तसेच अनेक आवश्यक बाबींची परवानगी नाही. त्यामुळे नागपूर मेट्रोतील पंतप्रधानांचा प्रवास असुरक्षित आहे. म्हणून हा प्रवास रद्द करण्याची मागणी 'जय जवान, जय किसान संघटने'चे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे.

प्रशांत पवार पत्रकारपरिषदेत माहिती देताना...

हेही वाचा - नागपुरात सुभाषनगर ते सीताबर्डी स्थानकादरम्यान मेट्रोची ट्रायल रन

पंतप्रधान ज्या मेट्रोमधून प्रवास करतील त्यामध्ये अग्निरोधक यंत्र नाहीत. अनेक महत्त्वाच्या बाबींची परवानगी नसतानाही पंतप्रधानाची मेट्रो राईड घडवणार आहे. पंतप्रधानांचा मेट्रो प्रवास असुरक्षित आहे. त्यामुळे या प्रकरणी नागपूर मेट्रोच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा या मागणीसाठी आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details