महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Plastics Ban : सिंगल युज प्लास्टिकवर केंद्रने घातली बंदी; प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्त उतरले रस्त्यावर - Strict adherence to plastic ban

केंद्र सरकाने सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी ( Plastics Ban ) घातली आहे. प्लास्टिक बंदीची काटेकोर अमंलवजावणी होण्यासाठी नागपूर महापालिकेचे ( Nagpur Municipal Corporation ) आयुक्त राधाकृष्णन बी यांनी रस्त्यावर उतरून प्लास्टिक न वापरण्याचे अवाहन केले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सिंगल युज प्लास्टिकचा ( Single use plastic ) वापर करणाऱ्या ग्राहकांसह प्रतिष्ठानांवर कारवाई सुरू केली आहे.

Center bans single use plastic
सिंगल युज प्लास्टिकवर केंद्रने घातली बंदी

By

Published : Jul 2, 2022, 6:21 PM IST

नागपूर -देशात १ जुलैपासून सिंगल युज (एकेरी वापर) प्लास्टिकवर बंदी ( plastics Ban ) घालण्यात आली आहे. या अनुषंगाने प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या १९ वस्तूंवरही बंदी ( Plastic Ban on 19 items ) घातली आहे. सिंगल युज प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी नागपूरचे महापालिका ( Municipal Corporation of Nagpur ) आयुक्त राधाकृष्णन बी स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना दुकानदारांना प्लास्टिकचा वापर करू नका असे आवाहन करत आहेत. प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या ( Use Cloth Bags ) वापरण्याचा सल्ला देत कापडी पिशव्यांचा वितरण सुद्धा त्यांनी केले आहे.दिवसेंदिवस वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. प्लास्टिकमुळे भविष्यात उदभवणार धोका ओळखूनचं केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे.

Plastics Ban : सिंगल युज प्लास्टिकवर केंद्रने घातली बंदी; प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्त उतरले रस्त्यावर

ग्राहकांवर कारवाई - प्लास्टिकवर बंदी निर्णयाचे काटेकोरपणे पालन ( Strict adherence to plastic ban ) व्हावे ही जबाबदारी स्थानिक संस्थावर आहे. नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या ग्राहकांसह प्रतिष्ठानांवर कारवाई सुरू केली आहे. या नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी व्हावी यासाठी नागपूरचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन. बी यांनी नागरिकांना तसेच दुकानदारांना सिंगल युज प्लास्टिक वापरू नका असे अवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी भाजीविक्रेते, फळ विक्रेते यांना प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये असे आवाहन करत त्यांनी नागरिकांना कापडी पिशव्या त्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा -Maha Assembly Speaker Election : महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लढवणारे राजन साळवी आहेत कोण?


प्लास्टिकच्या अनेक वस्तूंवर बंदी - केंद्र सरकारने १९ वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये फुग्यांची प्लास्टिकची काठी, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक, आइस्क्रीम स्टिक, थर्माकोल,प्लास्टिक प्लेट, कप,टंबरेल, काटे असलेला चमचा, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, पॅकेजिंग फिल्म, सिगारेट पाकिटे, 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक तसेच यात PVC बॅनरचा समावेश आहे.

कडक शिक्षेचे प्रावधान - सिंगल यूज प्लॅस्टिकपासून बनवलेल्या या वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सरकारने कठोर नियमावली लागू केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व उत्पादक, स्टॉकधारक, पुरवठादार आणि वितरकांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या 19 गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालावी. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर बंदी लागू न केल्यास त्याचे उल्लंघन करणाऱ्या संस्था बंद केल्या जातील. सिंगल-यूज प्लॅस्टिक वापरताना आढळून आल्यास त्याला एक वर्षाचा कारावास किंवा १ लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि प्रदूषण नियंत्रण समित्या सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचे काम करणार आहे. घरातून सिंगल युज प्लास्टिक कचरा निर्माण झाल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर कोणत्याही संस्था किंवा कंपनीने कचरा पसरविल्यास त्यांच्याकडून ५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.



सिंगल युज प्लास्टिक म्हणजे काय - सिंगल युज प्लास्टिक एकदाच वापरात येत असून वापर झाल्यानंतर ते प्लास्टिक फेकून दिले जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणानुसार देशात दररोज २६ हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यापैकी केवळ ६०% कचरा गोळा होतो. उर्वरित कचरा नदी-नाल्यांमध्ये मिसळतो किंवा तसाच पडून राहतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी २.४ लाख टन सिंगल यूज प्लास्टिक तयार होते.

हेही वाचा -Amravati Chemist Murder : उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांबाबत केलेल्या पोस्टमुळेचं; पोलीस उपायुक्तांनी केलं स्पष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details