महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वकील गुणरत्न सदावर्ते यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर खंडपीठात याचिका - MSRTC Workers

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी ऍड. गुणरत्न सदावर्ते ( Adv. Gunaratna Sadavarte ) यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून ( MSRTC Workers ) पैसे गोळा केल्याबाबत अकोला जिल्ह्यातील अकोट येथे गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी अकोट सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. या निर्णयाविरोधात अकोला येथील एसटी कामगार नेते विजय मालोकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अर्ज केला आहे.

नागपूर खंडपीठ
नागपूर खंडपीठ

By

Published : Apr 27, 2022, 10:08 PM IST

नागपूर -राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात ( Silver Oak Attack ) आरोपी म्हणून अटकेत असलेल्या ऍड. गुणरत्न सदावर्ते ( Adv. Gunaratna Sadavarte ) यांची 18 दिवसांनंतर तरुंगातून सुटका झाली. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत न्यायालयाकडून मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करावा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर बुधवारी (दि. 27 एप्रिल) सुनावणी झाली असून न्यायालयाने ऍड. सदावर्ते व राज्य सरकारला उत्तर देण्याबाबात नोटीस बजावली आहे.

माहिती देताना ऍड. आशिष फुले

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा दरम्यान कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्यात आले होते. त्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी अकोला जिल्ह्याच्या आकोट पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, वकील गुणरत्न सदावर्ते यांना अकोट सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. हा अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी अकोला येथील एसटी कामगार नेते विजय मालोकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत न्यायालयाने ऍड. सदावर्ते व राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

हेही वाचा -श्वास असेपर्यंत डंके की चोट पे लढू - ऍड. गुणरत्न सदावर्ते

ABOUT THE AUTHOR

...view details