महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Raut : 'दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना पसरला' - दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोना पसरला नितीन राऊत

दिल्लीवरुन येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून शहरात कोरोना पसरत असल्याचे मागील आकडेवारीनुसार ( People Coming From Delhi Spread Corona In Nagpur ) आलेल्या अहवालातून समोर आले आहे, असे राऊत यांनी म्हटलं ( Nitin Raut In Nagpur ) आहे.

Nitin Raut
Nitin Raut

By

Published : Jun 6, 2022, 8:11 PM IST

नागपूर -राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात नागपूरातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यावर आता नागपूरचे पालकमंत्री तथा उर्जामंत्री यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिल्लीवरुन येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून शहरात कोरोना पसरत असल्याचे मागील आकडेवारीनुसार आलेल्या अहवालातून समोर आले ( People Coming From Delhi Spread Corona In Nagpur ) आहे, असे राऊत यांनी सांगितले आहे. ते नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत ( Nitin Raut In Nagpur ) होते.

नितीन राऊत म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने चाचणीची सोय नागपूर विमानतळावर उपलब्ध केल्यास कोरोनाचा अटकाव करता येईल. त्याबाबतचे आदेश पालिका आयुक्तांना देणार आहे. शहरात जवळपास 35 रुग्ण आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे दिल्लीवरून आले आहेत. त्यामुळे दिल्लीवरुन येणाऱ्या लोकांपासून कोरोना वाढतोय, असे राऊत यांनी स्पष्ट केलं.

नितीन राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

येणाऱ्या काळात शहरातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणार आहे. तसेच, विमानतळावरच चाचणी झाल्यास तो संसर्ग शहरात न पसरता अगोदरच रोखला जाईल. यासाठी तपासणीची सोय नागपूर विमातळावर करावी अश्या सूचनाही नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन.बी आणि जिल्हाधिकारी विमला.आर यांना देणार आहे. तसेच, सध्या विजेचे संकट नाही. कोळसा आयात केला आहे. खाणीतूनही कोळसा मिळत आहे, असेही नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Shivsena Teaser : सत्ता असो वा नसो, आमचं हिंदुत्व तकलादू नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details