महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Indian Independence Day सैक्सोफोनवरील देशभक्ती गीत एकूण व्हाल मंत्रमुग्ध - सैक्सोफोनवरील देशभक्ती गीत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत Indian Independence Day विविध उपक्रम सुरु असतांना अनेक देशभक्ती गीत कानी पडतात मात्र हेच देशभक्ती गीत Patriotic song जर का त्यांच्या या सैक्सोफोन saxophone मधुन ऐकायला मिळाले की अगदी सगळे मंत्रंमंग्ध mesmerized होऊन ऐकायला लागतात होय अशी ही जादुची कीमया करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे दत्ता खंडारे ते पोलीस दलात शिपाई या पदावर A constable in the police force कार्यरत असुन खंडारे यांनी युट्युबवरील व्हिडीओ बघून सैक्सोफोन वाजवण्यास सुरवात केली होती

Indian Independence Day
सैक्सोफोनवरील देशभक्ती गीत

By

Published : Aug 13, 2022, 6:32 PM IST

Updated : Aug 13, 2022, 8:29 PM IST

नागपूरसंगीत म्हणजे शाश्वत सप्तसुर त्याला कुठल्याही शब्दांची किंवा हावभावाची गरज नाही. त्यातही भारतीय संगीत हे थेट आत्म्याला जाऊन भिडते असे कायम म्हटले जाते. जीवनातील अनेक दशके संगीताची साधना आणि तपश्चर्या करावी लागते. तेव्हा कुठे वादकाने तोंडातून फुंकलेली हवा सप्तसुरांच्या mesmerized रूपाने कानी पडते. असेच एक संगीताचे साधक नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत A constable in the police force आहे. पोलीस शिपाई दत्ता खंडारे असे असे या कलाकाराचे नाव आहे. दत्ता खंडारे जेव्हा सैक्सोफोन saxophone मध्ये तोंडातून हवा फुंकतात तेव्हा सुरांची जादू mesmerized अनुभवायला मिळते. दत्ता खंडारे सैक्सोफोनवर जेव्हा देशभक्तीपर गाणी Patriotic song वाजतात तेव्हा तर ते थेट उपस्थितांच्या काळजाला हात घालतात. नागपूर पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी दत्ता खंडारे यांच्या कलेचा प्रशंसक आहे.

सैक्सोफोनवर देशभक्ती गीत सादर करतांना दत्ता खंडारे




दत्ता खंडारे यांनी सैक्सोफोन वाजवण्याचे शिक्षण कुठेही घेतलेले नाही. कलेची आवड होती. मात्र कला अवगत करण्यास शिकवणी लावण्याची परिस्थिती नव्हती म्हणून दत्ता यांनी युट्युबवरील व्हिडीओ बघून सैक्सोफोन वाजवण्याचा सराव केला. सलग अडीच ते तीन वर्षे सराव केल्यानंतर आज त्यांच्यातील कला निखरून आली आहे.

सैक्सोफोनवर देशभक्ती गीत सादर करतांना पोलीस शिपाई दत्ता खंडारे


युट्युबला मानले गुरूदत्ता खंडारे हे पोलीस दलात शिपाई या पदावर कार्यरत असताना ते पोलीस बँड पथकात सहभागी झाले. बँड पथकात गेल्यानंतर त्यांनी सैक्सोफोन वाजवण्याची कला अवगत केली. दत्ता यांनी नोकरी सांभाळून आपली कला जोपासली आहे. ड्युटी दिवसा असेल तर ते रात्री सराव करत असे आणि रात्रपाळीची ड्युटी असेल तर ते दिवसा सराव करतात. त्यांच्या या प्रवासात युट्युब त्यांच्या साठी गुरुस्थानी आहे.


डीसीपी गजानन राजमाने यांनी दिली प्रेरणापोलीस उपायुक्त गजानन राजमाने हे गुन्हे शाखेचे डीसीपी म्हणून कार्यरत असताना त्यांनी दत्ता खंडारे यांच्यातली कला ओळखली. राजमाने सर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्यामुळे मी आज माझी कला जोपासू शकलो. अशी भावना दत्ता खंडारे यांनी ईटीव्ही भारत कडे व्यक्त केली.

हेही वाचाकेंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर महाराष्ट्रातील या 11 पोलीस अधिकाऱ्यांना जाहीर

Last Updated : Aug 13, 2022, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details