नागपूर - कुख्यात गुंड अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पॅरोल मंजूर केला आहे. पत्नीच्या आजारपणाचे कारण मान्य करून नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
अरुण गवळीला कोर्टाकडून पॅरोल, विभागीय आयुक्तांनी फेटाळला होता अर्ज - arun gawali
कुख्यात गुंड अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पॅरोल मंजूर केला आहे. पत्नीच्या आजारपणाचे कारण मान्य करून नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
गवळीने नागपूर विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर विभागीय आयुक्तांनी संबंधित अर्ज फेटाळला. यानंतर अरुण गवळीने पॅरोलसाठी नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. अरुण गवळी यापूर्वी संचित रजेवर बाहेर आल्यावर कोणतेही अनुचित कार्य केले नसल्याचे गवळीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर न्यायालयाने अरुण गवळीला पॅरोल मंजूर केला आहे.
शिवसेना नेते कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्येप्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून सध्या तो नागपूर मध्यवर्ती तुरुंगात आहे.