महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या उपराजधानीत दाखल - ऑक्सिजन एक्स्प्रेस

विशाखापट्टणमहून या काळात लोकांना जीवनदान देणारी ऑक्सिजन एक्स्प्रेस 8 वाजून 10 मिनिटाने नागपूरचा मुख्य रेल्वे स्थानकावर पोहचली. या एक्स्प्रेसमध्ये असलेले ७ टँकर्स पैकी 3 टँकर नागपूरात उतरविण्यात आले.

विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या उपराजधानीत दाखल
विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या उपराजधानीत दाखल

By

Published : Apr 23, 2021, 8:48 PM IST

Updated : Apr 23, 2021, 10:07 PM IST

नागपूर -विशाखापट्टणमहून या काळात लोकांना जीवनदान देणारी ऑक्सिजन एक्स्प्रेस 8 वाजून 10 मिनिटाने नागपूरचा मुख्य रेल्वे स्थानकावर पोहचली. या एक्स्प्रेसमध्ये असलेले ७ टँकर्स पैकी 3 टँकर नागपूरात उतरविण्यात आले. विशाखापट्टणमहून निघालेले ही ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात आज दाखल झाली आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. परिणामी तुटवडा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात अडचणीत वाढ झाली आहे. यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस जीवनवाहिनी ठरणार आहे.

रुग्णांना काहीसा दिलासा-

नागपूर जिल्ह्यात दररोज 7 हजाराच्या घरात नव्याने कोरोना बाधित मिळून येत आहे. रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत 73 हजारच्यावर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जाऊन पोहचली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नागपूर शहरात इतर शहरातून ऑक्सिजनची गरज भागवली जात आहे. या ऑक्सिजन एक्सप्रेसमुळे काहीसा दिलासा रुग्णांना मिळणार आहे.

तीन टँकर नागपूर येथे उतरवले-

रेल्वेद्वारे महाराष्ट्रासाठी रोल ऑन रोल म्हणजे रोरो पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा एक्सप्रेसच्या माध्यमातून केला जाणार आहे. नवी मुंबईच्या कळंबोली रेल्वे स्थानकातून १८ एप्रिलला रात्री ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला रवाना झाली. एक्स्प्रेसवरील ७ टँकर्सपैकी ऑक्सिजन घेऊन विशाखापट्टणमच्या स्टील प्लॅन्टमधून ऑक्सिजनचे टँकर्स भरण्यात आले आहेत. ही एक्स्प्रेस विशाखापट्टणम मधून रवाना झाली आहे. आज ती नागपूरला पोहचली असून. तीन टँकर नागपूर येथे उतरवले असून उरलेले 4 टँकर नाशिक येथे शनिवारी सकाळी उतरवणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा-९० वर्षाच्या पैलवानाने कोरोनाला 'दोनदा' केले चितपट, म्हणाले- 'जो डर गया सो मर गया'
Last Updated : Apr 23, 2021, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details