महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात सात दिवसांत 12 हजार कोरोनामुक्त, गुरुवारी 4900 बाधितांची भर - Nagpur Thursday corona cases

नागपूर जिल्ह्यात 21 हजार 878 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 4900 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 2720 तर ग्रामीण भागातील 2167 बाधित रुग्ण मिळून आले आहे

नागपुरात सात दिवसात 12 हजार कोरोनामुक्त
नागपुरात सात दिवसात 12 हजार कोरोनामुक्त

By

Published : May 7, 2021, 7:55 AM IST

नागपूर - शहर आणि जिल्ह्यात मिळून गुरुवारी 4900 कोरोनाबधितांची भर पडली आहे. सातव्या दिवशी बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्याची रुग्णसंख्या अधिक आहे. यात 6338 जण हे कोरोनातून बरे झाले आहेत. यात गुरुवारी आलेल्या अहवालात 81 जण दगावले तर, सक्रिय रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे.

गुरुवारी नागपूर जिल्ह्यात 21 हजार 878 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 4900 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 2720 तर ग्रामीण भागातील 2167 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 81 रुग्णांचा नागपूर जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे.

यामध्ये शहरी भागात 48, ग्रामीण भागात 21 तर जिल्हाबाहेरील 13 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. गुरुवारी 6 हजार 338 जण कोरोनामुक्त झाले आहे. सक्रिय रुग्णसंख्येत सातव्या दिवसात घट होऊन 76 हजार वरून 64597 पोहोचली आहे. यामुळे मागील सात दिवसांत 12 हजारच्या घरात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पूर्व विदर्भात 68 हजार झाले कोरोनामुक्त-

गुरुवारी आलेल्या अहवालात पूर्व विदर्भात 11 हजार 24 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 8 हजार 848 जण कोरोनाबाधित झाले आहेत. यात मागील 7 दिवसात सहा जिल्ह्यात 68 हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 155 जण हे कोरोनामुळे दगावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details