नागपूर- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करून राज्य सरकारने ओबीसीवर अन्याय केल्याचा आरोप करत भाजपच्या ओबीसी मोर्चा कडून काल नागपूरच्या संविधान चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
'राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी समाजवर अन्याय'
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढला होता. मात्र ठाकरे सरकारने याकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे आज ओबीसी समाजाला आपल्या हक्का पासून वंचित राहावे लागणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात तब्बल दीड वर्ष सुनावणी झाली, मात्र याकडे राज्य सरकारने लक्षच दिले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी समाजवर अन्याय होत असल्याचा आरोप सुद्धा आंदोलकांनी केला आहे.