नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जनादेश यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या कामाचा पाढा वाचला जात आहे. सरकारने 5 वर्षात जनतेची कामे केली असती तर आज सरकारला जनादेश यात्रा काढण्याची गरजच उरली नसती. अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
..तर महाजनादेश यात्रा काढण्याची गरज पडली नसती, वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा - अपयश
भाजप-सेनेच हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी झाल्याने जनादेश यात्रा काढत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज ठाकरे यांच्या पुढाकाराने ९ तारखेला काढण्यात येणाऱ्या ई व्हीएम विरोधी मोर्चात पक्ष म्हणून आम्ही सहभागी आहोत, असे ते म्हणाले.
सरकारने जनतेची काम केली असती तर त्यांना महाजनादेश यात्रा काढण्याची गरज पडली नसती- विजय वडेट्टीवार
भाजप-सेनेच हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी झाल्याने जनादेश यात्रा काढत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज ठाकरे यांच्या पुढाकाराने 9 ऑगस्टला मुंबई काढण्यात येणाऱ्या ईव्हीएम विरोधी मोर्चात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस देखील सहभागी होणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.