महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संसदेत विरोधकांना कामापेक्षा धिंगाणा मस्ती करायची आहे- रामदास आठवले - संसदेत विरोधकांना कामापेक्षा धिंगाणा मस्ती करायची आहे

जे काही संसदेच्या सभागृहाच्या इतिहासात कलंक लावणारा गंभीर प्रकार घडला आहे. संसदेत राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने वागवले जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे. सरकारने अनेकवेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना चर्चा करायची नसल्यास कोण काय करणार, ते चर्चा करायला तयार नव्हते हा आरोप चुकीचा आहे.

ramdas aathvle
रामदास आठवले.

By

Published : Aug 13, 2021, 9:42 AM IST

नागपूर - संसदेत सुरू असलेल्या गोंधळावर केंद्रीय समाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. विरोधकाना संसदेत काम करू द्यायचे नाही आहे म्हणून गोंधळ आणि धिंगाणा मस्ती करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते नागपूरात विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानासमोर डोके टेकवतात. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या विचारातील भारत उभा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे विरोधकांचे आरोप चुकीचे आहे. मात्र, संसदेच्या सभागृहाच्या वेळेत सातत्याने तीन दिवस गोंधळ घातल्यास 1 वर्षासाठी निलंबित करावे असेही ते म्हणाले.

जे काही संसदेच्या सभागृहाच्या इतिहासात कलंक लावणारा गंभीर प्रकार घडला आहे. संसदेत राहुल गांधींना चुकीच्या पद्धतीने वागवले जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे. सरकारने अनेकवेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना चर्चा करायची नसल्यास करणार, ते चर्चा करायला तयार नव्हते हा आरोप चुकीचा आहे.

राहुल गांधींनी आरोप केला की भाजपा आणि आरएसएस संविधान दाबण्याचे काम करत आहे. यावर बोलतांना संविधानाच्या आधारावर काम करत आहे, चुकीचे आरोप आहे. सबका साथ सबका विकास हे धोरण त्यांचे आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पार्टीची दशा झाली आहे असेही ते म्हणाले.

कामाऐवजी दंगामस्ती करण्याचे काम
विरोधीपक्ष संसदेत कामकाज करण्याऐवजी दंगा मस्ती करण्याचे काम करत आहे. या चौकशीसाठी समिती नेमली आहे. यामुळे जे काही चौकशीत पुढे येईल त्यांच्यावर कारवाई होईल. एखाद्या वेळेस हे ठीक आहे. पण रोजच होणार असले तर कामकाज चालणार कसे असेंही ते म्हणालेत. सतत तीन दिवस संसदेच्या वेळेत गदारोळ केल्यास, तर वर्षभरासाठी निलंबित करण्याची मागणीही तिने केली आहे. काश्मीरमध्ये राहुल गांधीच्या सभेत बॉम्ब ब्लास्ट तसेच काश्मिरात बॉम्ब ब्लास्ट होत असतात. सभा पंतप्रधानांची असों की राहुल गांधींची. या घटना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या वतीने आतंकवादविरोधी कारवाई सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details