महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Opposing Contract Recruitment : एसटी चालक, वाहक पदाच्या कंत्राटी भरतीला उमेदवारांचा विरोध - Candidates oppose contract recruitment

एसटी चालक, वाहक पदाच्या कंत्राटी भरतीला उमेदवारांचा विरोध विरोध आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ( Maharashtra State Road Transport Corporation ) पाच हजार एसटी चालक वाहक पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती ( Contract recruitment for ST driver post ) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आता उमेदवारांनी विरोध ( Candidates oppose contract recruitment ) सुरू केला आहे. भरती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या चालक आणि वाहकांना सेवेत रुजू करण्याच्या मागणीसाठी उमेदवारांनी एकत्रित येत नागपूर परिवहन महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Opposing recruitment on contract basis for ST driver, carrier post
एसटी चालक, वाहकपदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याला विरोध

By

Published : Jul 2, 2022, 2:56 PM IST

नागपूर -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ( Maharashtra State Road Transport Corporation ) पाच हजार एसटी चालक वाहक पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेला विरोध वाढला आहे. सरळ सेवा भरती परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी एकत्रित ( Candidates oppose contract recruitment ) येत नागपूर परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सरळ सेवा भरती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या चालक आणि वाहकांना सेवेत रुजू करावे, कंत्राटी पदाची काढण्यात आलेली निविदा सूचना रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा -मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद - संजय राऊत

पात्र उमेदवारांची अद्यापही नाही-चालक आणि वाहक पदाकरिता उमेदवारांची लेखी परिक्षा होऊन वाहन चालण चाचणी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथे झाली होती. कागदपत्राची तपासणी सुद्धा झाली असुन वैद्यकिय तपासणी शासकिय रुग्णालयात करण्यात झालेली होती. चालक तथा वाहक या पदाचे सेवापूर्व प्रशिक्षण सुद्धा पुर्ण झालेले आहे. दोन वर्षाचा कालावधी लोटुनही नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने पात्र उमेदवारांनी अनेक वेळा परिवहन मंत्री यांना वारंवार निवेदन देण्यात आले होते. 2019 मध्ये सरळ सेवा भरतीची प्रक्रिया केल्यानंतर देखील पात्र उमेदवारांची अद्यापही नियुक्ती न घेता कंत्राट पध्दतीवर चालक या पदाची भरती करणे ही आमचा बेरोजगारांची थट्टा असल्याचा आरोप आकाश गेडाम या उमेदवाराने केला आहे.



अन्यथा न्यायालयात दाद मागणार - हजारो उमेदवार मागिल ३ वर्षापासुन चालक तथा वाहक या पदाच्या नियुक्ती पत्राची वाट पाहत आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकट आले असल्याचे तोंडी कारणे देऊन एस.टी. महामंडळने आम्हाला मानसिक त्रास दिला आहे. एस.टी. महामंडळ आम्हाला रोजगारापासून वंचित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी काढलेली भरती निविदा त्वरित रद्द करण्यात यावी अन्यथा न्यायालयात दादा मागणार असल्याची भूमिका उमेदवारांनी घेतली आहे.


हेही वाचा -Medical Professionals Murder : मेडिकल व्यावसायिकाची निघृर्ण हत्या, नुपुर शर्मा प्ररणाचा संशय?

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details