महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात एकाला कोरोनाची बाधा, पाच रुग्ण कोरोना मुक्त - News about Corona virus

नागपूरमध्ये आज दिवसभरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला. शहरातील पाच रुग्णांना कोरोना मुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले.

One corona patient was found during the day in nagpur
नागपुरात एकाला कोरोनाची बाधा झाली असून पाच रुग्ण झाले कोरोना मुक्त

By

Published : May 5, 2020, 9:51 PM IST

नागपूर -आज केवळ एकाच नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६१ वर जाऊन पोहचली आहे. सोमवारी दिवसभरात सात व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये दोन चिमुकल्यांचा देखील समावेश होता. आज पाच कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी देखील गेलेले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला आधीच क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

नागपुरात एकाला कोरोनाची बाधा झाली असून पाच रुग्ण झाले कोरोना मुक्त

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचा वेग मंदावला आहे. आज नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६१ पर्यंत जाऊन पोहचली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे सतरंजीपुरा परिसरातील आहेत. या परीसरातील बाधित रुग्णांचा आकडा ९० असल्याचे सांगितले जात आहे. सतरंजीपुरा येथील मृत व्यक्तीच्या संपर्कात आल्याने नागपुरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

दुसरीकडे कोरोनाला पराभूत केल्यानंतर ठणठणीत बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णाची संख्या देखील वाढत आहे. आज पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 63 इतका झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 39 दिवसांनंतर 16 वर्षीय मुलीला रुग्णालयातून सुट्टी मिळली आहे. तिच्यासाठी तिचे वडील देखील रुग्णालयातच थांबून होते, ते सुमारे 20 दिवसांपूर्वीच कोरोना मुक्त झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details