नागपूर-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरमध्ये ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद (First Patient Of Omicron Found In Nagpur) झाली आहे. या वृत्ताला नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी (Municipal Commissioner Radhakrishnan B)यांनी दुजोरा दिला आहे. रुग्णाची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome Sequencing Test) पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital Nagpur) दाखल करण्यात आले आहे.
Omicron In Nagpur : उपराजधानी नागपुरात ओमायक्रॉनचा शिरकाव, पहिल्या रुग्णाची नोंद - covid 19
आफ्रिकेचा दौरा करून नागपूर शहरात दाखल झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हॅरिएंट आढळून (First Patient Of Omicron Found In Nagpur) आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने (Nagpur Municipal Corporation Administration) या माहितीला दुजोरा दिल्याने, नागपूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
रुग्णाने केला आफ्रिकेचा दौरा
सुत्रांच्या माहितीनुसार, ओमायक्रॉन बाधित रुग्ण पुरुष असून, ते नुकतेच आफ्रिका देशाचा दौरा (Africa Tour) करून नागपूरला परतला आहे. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेल्या 40 वर्षीय रुग्णाची नागपुरात परतल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर काही सॅम्पल्सची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीही करण्यात आली होती. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला ओमायक्रॉन विषाणूंचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले.
रुग्ण एम्समध्ये दाखल
४० वर्षीय इसमाला ओमायक्रॉन विषाणूंचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर ते कुटुंबियांसह ज्यांच्या संपर्कात आले, त्यांची देखील चाचणी करण्यात आली असून, सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.