नागपूर - शहराच्या सदर परिसरातील आझाद चौक येथे एक जीर्ण घर कोसळले आहे. या दुर्घटनेत घरातील चार सदस्य ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागासह महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर सर्व जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
नागपूरच्या सदर परिसरात जुने घर कोसळले; एकाचा मृत्यू, चार जखमी
नागपूरच्या आझाद चौक येथे जीर्ण झालेले जुने घर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून इतर चार जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहे.
आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास जीर्ण घर कोसळल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना घडली, त्यावेळी प्रभा टेकसुल्तान (वय 55 वर्षे), लक्ष्मी टेकसुल्तान (वय 65 वर्ष), लोकेश टेकसुल्तान (वय 22 वर्षे), राकेश सिरोहिया (32 वर्षे) आणि किशोर टेकसुल्तान हे पाच जण घरात होते. घर कोसळल्याने ते सर्व घराच्या मलब्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्स फायर स्टेशन, सुगरनगर फायर स्टेशन, कॉटन मार्केट स्टेशन आणि गंजीपीठ अग्निशमन केंद्रातील शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन विभागला यश आले आहे. तर किशोर टेकसुल्तान यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.