नागपूर - राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य सरकारला पत्र देऊनही नाकर्त्या सरकारने ओबीसी हिताचे (OBC Political Reservation) कुठलेच पाऊले न उचलल्याचा आरोप भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसीच्या उमेदवारांवर अन्याय झाला. यामुळे सरकार तत्काळ आजच्या-आज निवडणूक आयोगासोबत बैठक घ्यावी, वेळ पडल्यास सुप्रीम कोर्टात जाऊन निवडणुका पुढे ढकलावे, अशी मागणी भाजपानेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केली. ते माध्यमांशी बोलत होते.
भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे 'नाकर्त्या सरकारची ओबीसी आरक्षणाच्या नावावर नौटंकी' नाकर्त्या राज्य सरकारने ठोस पावले उचले असते, तर ही वेळ आली नसती. राज्यातील 85 जिल्हा परिषद आणि 144 पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतः यावर काही बोलत नाही, ओबीसीचे नेते तथा मंत्री वडेट्टीवार ओबीसीला न्याय मिळवून देऊ असे म्हणतात. यानंतरही निवडणुका जाहीर झाल्या आहे. तिन्ही पक्षानी नौटंकी चालु केली आहे. सरकारमधील नेते छगन भुजबळ आंदोलन करत आहे. काँग्रेसचे मंत्री चिंतन बैठक घेत आहे, नाना पटोले राजकीय वक्तव्य करत आहे. या सरकारमध्ये ओबीसींवर अन्याय करण्याचे अंतर्गत कलह किंवा राजकारण चालू आहे, अशी टिकही यावेळी बावनकुळे यांनी केली आहे.
'ओबीसींना आरक्षणासाठी 1 हजार ठिकाणी आंदोलन करणार'
महाराष्ट्र सरकारचे मंत्री निवडणुका होऊ देणार नाही, असे फक्त म्हणत आहे. पण आम्ही यासाठी 26 जूनला राज्यभर 1 हजार ठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहोत. सरकारच्या मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार आहे, असा इशाराही यावेळी बावनकुळे यांनी दिला. महाविकास आघाडी सरकार ओबीसीवर अन्याय करत आहे. राज्य निवडणूक आयोग हे राज्य सरकारच्या संमतीने काम करत आहे. दुसरीकडे राज्यातील मंत्री ओबीसीचे आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असे म्हणत आहे. पण राज्य निवडणूक आयोग निवडणुका घोषित कशा करू शकतात? असा सवालही भाजपा नेते बावनकुळे यांनी केला आहे. यामुळे सरकारचे काम म्हणजे बोलाची कढी बोलाचा भात आहे. ओबीसींवर अन्याय करत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.
'आम्ही मदत करायला तयार आहोत'
सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन दोन महिने लोटले असताना, सरकारने कुठलेही पावले उचलले नाही. त्याच्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुका लावण्यात आले आहे. यामुळे सरकारला आमची विनंती आहे, आम्ही तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. ओबीसींवरचा अन्याय रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाऊन निवडणुका रद्द करावे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
हेही वाचा -केंद्रातले मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही अत्याचारी; नाना पटोलेंची जळगावच्या फैजपूरात घणाघाती टीका