महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परिचारिकांचे आजपासून बेमुदत संप, आरोग्यव्यवसथा कोलमडण्याची शक्यता - खासगीकरण बंद

महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेने खासगीकरण विरोधात मागील पाच दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले. पण, आरोग्य व्यवस्थेवर परिणाम पडूनही सरकार याकडे लक्ष देत नसल्याने त्यांच्या मागण्यांकडे कुठलेही लक्ष दिले नाही. त्यामुळे आजपासून (दि. 28 मे) बेमुदत संपावर जाण्याच्या इशारा दिला आहे.

c
c

By

Published : May 28, 2022, 3:25 PM IST

Updated : May 28, 2022, 4:33 PM IST

नागपूर - महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेने खासगीकरण विरोधात मागील पाच दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले. पण, आरोग्य व्यवस्थेवर परिणाम पडूनही सरकार याकडे लक्ष देत नसल्याने त्यांच्या मागण्यांकडे कुठलेही लक्ष दिले नाही. त्यामुळे आजपासून (दि. 28 मे) बेमुदत संपावर जाण्याच्या इशारा दिला आहे.

आजपासून परिचारिकांचे बेमुदत संप

यात परिचारिका संघटनेच्या वतीने खासगीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने परिचारिका भरतीत खासगीकरण बंद करण्यात यावे. तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार 7 हजार दोनशे रुपये वेतनवाढ मिळावी, अशी मागणी केली जात आहे. यात गणवेश भत्ता देण्यात यावा. कोरोनाच्या काळात 300 तीनशे अर्जित रजा देण्यात याव्या शासन ते देण्यास तयार नाही, प्रशासकीय बदली न करता विनंती बदली द्यावी, कारण त्यामुळे आमच्या कुटुंब विस्कळीत होण्याची भीती आहे. विद्यार्थी परिचारिकांना विद्यावेतन देण्यात यावे, स्टाफ नर्स हे पदनाम बदलवत नर्सिंग ऑफिसर असा बदल करून देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून करण्यात येत आहे.

मागील तीन वर्षापासून शासनाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा करत आहोत,पण मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आम्ही 23 तारखे पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पण प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलन करण्यात येत आहे.

हेही वाचा -Electric Bike Issue Nagpur : इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री जोरात; कायद्याची माहिती नसल्याने विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक

Last Updated : May 28, 2022, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details