महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nupur Sharma : नुपूर शर्माच्या पोस्टला समर्थन दिल्याने नागपुरच्या एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी - पोलीस आयुक्त - नुपूर शर्मा

अमरावतीतील घटना ताजी असतांनाच नागपुरच्या एका २२ वर्षीय तरुणाला धमक्या ( Threats ) मिळत आहेत. नुपूर शर्माच्या ( Nupur Sharma ) वादग्रस्त वक्त्याला या तरुणाने पाठिंबा दिला होता. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्त्याचे सोशल मीडियावर समर्थन केल्यामुळे उदयपूर येथील कन्हैयालाल तसेच अमरावतीच्या उमेश कोल्हे या दोघांची निर्घृण हत्या झाली आहे.

Supporting Nupur Sharma's post threatens to kill a family in Nagpur
नुपूर शर्माच्या पोस्टला समर्थन दिल्याने नागपुरच्या एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

By

Published : Jul 4, 2022, 3:26 PM IST

नागपूर -नागपुरच्या एका २२ वर्षीय तरुणाने नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्त्याला पाठिंबा दिल्याने त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. एवढंच नाही तर, काही आरोपी त्या तरुणाला शोधत घरापर्यंत पोहचले होते. त्यावेळी पोलिसांनी हे प्रकरणी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे त्या तरुणाला कुटुंबीयांसह घरदार सोडून अज्ञातस्थळी राहावे लागत आहे. सुमारे दोन आठवडे आधी ही घटना घडली होती. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्त्याचे सोशल मीडियावर समर्थन केल्यामुळे उदयपूर येथील कन्हैयालाल तसेच अमरावतीच्या उमेश कोल्हे या दोघांची निर्घृण हत्या झाली आहे.

वादग्रस्त वक्तव्य -विशिष्ट धर्म-धर्मगुरु संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले आहे. मात्र, या प्रकरणाची आग देशभर पसरली आहे. नुपूर शर्माच्या वादग्रस्त समर्थन केल्यानंतर राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैयालाल तसेच अमरावतीमध्ये उमेश कोल्हे नामक इसमांची हत्या झाली आहे. त्यामुळे देशाचे सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. नागपुरातही अशीच एक घटना अगदी थोडक्यात टळली आहे.

हेही वाचा -Maharashtra CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव, १६४ आमदारांचे मत

असा आहे घटनाक्रम -नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे एक कुटुंब १५ जूनपासून नागपूर शहर सोडून अज्ञात ठिकाणी राहत आहे. 14 जून रोजी नागपूरच्या वर्धमान नगर भागात राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाने त्याच्या इंस्टाग्रामवर नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर काही वेळात त्याला धमक्यांचे मॅसेज, फोन येऊ लागले होते. जीवे मारण्याच्या धमक्यांनी घाबरलेल्या तरुणाने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र,पोलिसांनी हे प्रकरणात फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे दोन दिवसानंतर शंभर तरुणांचा जमाव त्यांच्या घरावर चाल करून आला. मात्र, त्या तरुणाला, त्याच्या कुटुंबाला सुदैवाने त्याची माहिती मिळाल्यामुळे ते वेळीच परिसरातील एका हॉटेलमध्ये जाऊन लपले. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. दोन दिवस हॉटेलमध्ये काढल्यानंतर त्या कुटुंबाने नागपूर सोडण्याचा निर्णय घेतला. आज या घटनेला 20 दिवस लोटले असून ते कुटुंब घरी परत येण्याच्या मनस्थितीत नाही.

पोलिसांकडून सुरक्षेची हमी - राजस्थानच्या उदयपूर नंतर अमरावती येथे घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण कुटुंब दहशतीत आहे. कुटुंबीय नागपुरात येऊन राहण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Commissioner of Police Amitesh Kumar ) यांनी या कुटुंबाला सुरक्षेची हमी दिली आहे.

हेही वाचा -Eknath Shinde Gov Floor Test : दरवाजे बंद झाल्याने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवारांसह 10 जण गैरहजर

ABOUT THE AUTHOR

...view details