नागपूर -उपराजधानी नागपूरात कोरोना सोबतचे आता व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने नागपूर महानगर पालिकेने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली ( Dengue Patients Increased in Nagpur ) आहे. या अंतर्गत शहरातील सर्वच भागातील घरांचे मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू झाले आहे. रोज साधारपणे 4 हजार घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.
4636 घरांचे सर्वेक्षण - नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये गुरुवारी 4636 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर आज सुद्धा चार हजार घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.