नागपूर- महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या महिला सेक्रेटरींनी महिला आयोगाकडे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंढे यांनी अपमानजनक वागणूक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यावरून महिला आयोगाने मुंढे यांना नोटीस बजावत 7 दिवसांमध्ये आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
महिलेच्या तक्रारींवरून मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस - Tukaram Mundhe latest news
महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या महिला सेक्रेटरींनी महिला आयोगाकडे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती.
गेल्या महिन्यात झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे जेष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे महिलांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत गेली आहे. स्मार्ट सिटी कॉर्पोशनच्या कंपनी सेक्रेटरी असलेल्या महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मुंढे यांनी त्यांना प्रसूतीचा लाभ नाकारत मानसिक छळ केला, शिवाय त्यांना मातृत्व हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या तक्रारींनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांना सात दिवसात आपली भूमिका स्पष्ठ करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत.