महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur Girl Suicide : निकिताची हत्या नसून आत्महत्या.. पोलिसांच्या तपासात झाला 'हा' धक्कादायक खुलासा - नागपूरमध्ये मुलीची हत्या

नागपूरमध्ये निकिता चौधरी या २३ वर्षीय मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासातून धक्कादायक खुलासा झाला आहे. निकिताची हत्या झाली ( Nagpur Girl Murdered ) नसून, तिने आत्महत्या केली असल्याचे ( Nagpur Girl Suicide ) पोलीस तपासात उघड झाले ( Nikita Choudhari Not Murdered But Suicide ) आहे.

निकिता चौधरी
निकिता चौधरी

By

Published : Mar 17, 2022, 3:31 PM IST

Updated : Mar 17, 2022, 5:12 PM IST

नागपूर : 23 वर्षीय निकिता चौधरीचा अर्धवट जळालेला मृतदेह काल रात्री वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती मार्गावरील सुराबर्डी परिसराच्या निर्जनस्थळी आढळून आला होता. निकिताचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने प्रथमदर्शनी तिची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात निकिताची हत्या झाली नसून, तिने स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झालेला ( Nikita Choudhari Not Murdered But Suicide ) आहे. या संदर्भात शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Nagpur City CP AmiteshKumar ) यांनी माहिती दिली आहे.

निकिताची हत्या नसून आत्महत्या.. पोलिसांच्या तपासात झाला 'हा' धक्कादायक खुलासा

तिची आत्महत्याच पण..

निकिता गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय पोलिसांना आहे. निकिता मंगळवारी बेपत्ता झाली होती. त्यानंतरचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यावरून पोलिसांनी निकिताची हत्या झाली नसून, तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच यासंदर्भात निर्णयापर्यंत जाता येईल, असे देखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

निकिता चौधरी

मित्राकडून मागवले डिझेल

खासगी कारणाने निकिता मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात इतर कुणाचा सहभाग दिसून येत नसला तरी तिने खोटं कारण सांगून मित्राकडून डिझेल मागवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

Last Updated : Mar 17, 2022, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details