महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Crime Free Nagpur : फेब्रुवारी महिन्यात नागपुरात एकही हत्येची नोंद नाही, क्राईम फ्री नागपूर होणार? - नागपूर हत्या नोंद बातमी

आज पुढे आलेल्या आकडेवारी नंतर पुन्हा एकदा ( Not Single Murder In Nagpur ) क्राईम फ्री नागपूर ( Crime Free Nagpur ) होऊ शकते, ही आशा निर्माण झाली आहे. गुन्हेगारांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि शहर पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र केलेल्या प्रयत्नांमुळे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली असल्याचं मत शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Amitesh Kumar ) यांनी व्यक्त केलं आहे.

Nagpur Murder Free News
Nagpur Murder Free News

By

Published : Mar 1, 2022, 9:14 PM IST

Updated : Mar 1, 2022, 9:30 PM IST

नागपूर - शहराच्या इतिहासात पहिल्यांदाचं संपूर्ण महिनाभरात नागपुरात एकही हत्येची घटना घडली नसल्याची नोंद झाली आहे. नागपूर शहराचा इतिहास लक्षात घेता दरदिवशी घडणाऱ्या गंभीर गुन्हेगारी घटना रोखण्यात पोलिसांना कधी यश येईल का, असा प्रश्न कधी काळी विचारला जात होता. मात्र, आज पुढे आलेल्या आकडेवारी नंतर पुन्हा एकदा ( Not Single Murder In Nagpur ) क्राईम फ्री नागपूर ( Crime Free Nagpur ) होऊ शकते, ही आशा निर्माण झाली आहे. गुन्हेगारांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि शहर पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र केलेल्या प्रयत्नांमुळे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली असल्याचं मत शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Amitesh Kumar ) यांनी व्यक्त केलं आहे.

प्रतिक्रिया

'नागपूर शहर गुन्हेगारी मुक्त होऊ शकते' -

नागपूर शहरात प्रत्येक वर्षाकाठी सरासरी 100 हत्येच्या घटना घडतात. त्या हिशोबाने दर महिन्यात आठ ते नऊ खून नागपूर शहरात होत असल्याची नोंद आहे. गेल्या दोन महिन्यांचे आकडे बघितले तरी 9 हत्या झालेल्या आहेत. यापैकी डिसेंबर महिन्यात 5 तर जानेवारी मध्ये 4 हत्या झाल्याची नोंद पोलीस दरबारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहर पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे आज सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. पोलिसांनी वर्षभरात 68 एमपीडीए कायद्या अंतर्गत डिटेन करण्यात आले आहे, शंभरच्या वर गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई झाली आहे. 150 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील 6 हजार पेक्षा अधिक गुन्हेगारांचा डोगियर तयार करून त्यांच्यात कायद्याची भीती निर्माण केल्यामुळेच आज नागपूर शहर गुन्हेगारी मुक्त होऊ शकतो ही आशा निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

पाच वर्षात झालेल्या हत्या

नागपूर शहरात प्रत्येक महिन्यात हत्येच्या घटना घडत असतात. गेल्या पाच वर्षात किती हत्या घडल्या आहेत यावरील आकडेवारीवर एक नजर टाकूया. 2017 या वर्षात 91 हत्येच्या घटना घडल्या होत्या,तर 2018 मध्ये 94 खून झाल्याची नोंद पोलिसांच्या रेकॉर्ड मध्ये आहेत. 2019 या वर्षात तर 90 आणि 2020 मध्ये 97 हत्येच्या घटना घडल्याची नोंद आहे. गेल्यावर्षी 2021 मध्ये सुद्धा 95 जणांची हत्या झाली होती.

गेल्या पाच वर्षात फेब्रुवारीमध्ये किती हत्या झाल्या -

नागपूर पोलिसांच्या माहितीनुसार दर वर्षी सरासरी 100 हत्येच्या घटना घडतात तर महिन्यात 8 ते 9 हत्या होतात. फेब्रुवारी 2021 मध्ये नागपूर शहरात 9 हत्येच्या घटना घडल्या होत्या, तर फेब्रुवारी 2020 या वर्षात 6 हत्येच्या घटना झाल्याची नोंद आहे. फेब्रुवारी 2019 साली 6 हत्या तर फेब्रुवारी 2018 मध्ये 4 लोकांची हत्या झाली. फेब्रुवारी 2017 या वर्षात हत्येचा आकडा हा 8 होता.

हेही वाचा -Minister Amit Deshmukh Aurangabad : 'युक्रेन रशियाच्या धर्तीवर महाराष्ट्रात वैद्यकीय शुल्क करण्यासाठी अभ्यास सुरु'

Last Updated : Mar 1, 2022, 9:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details