नागपूर- संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरणासह अनेक मागण्यासाठी आंदोलन सुरू ( ST Workers Strike ) आहे. यामुळे बहुतांश कर्मचारी हे संपावर आहेत. त्यामुळे संपावरील कर्मचाऱ्यांची डोळे तपासणी मोहीम होऊ शकली नसल्याची माहिती नागपूरचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली. मात्र, जे चालक संपातून पुन्हा कामावर रुजू होत आहेत, त्यांना डोळे तपासणीनंतरच रुजू केले जात आहे, असेही बोलसरे यांनी सांगितले.
नागपूर विभागात 622 चालक - नागपूर शहर आणि ग्रामीण भागात चार डेपो असून यामध्ये जवळपास 622 चालक आहे. यामध्ये 40 वर्षे वयोमर्यादेपेक्षा 196 चालक आहे. तेच चाळीशी ओलांडले 424 चालक आहे. चालकावर भरोसा ठेवून शेकडो प्रवासी दिवसभर प्रवास करतात. त्यामुळे डोळ्याच्या कमजोरीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठीच चाळीशीनंतर वेळोवेळी डोळे तपासणी करणे गरजेचे आाहे. जेणेकरून गरजेनुसार चष्मा तसेच इतर उपचार करून घेतले जाऊ शकेल.
नेत्र तज्ज्ञ म्हणतात शारिरिक बदलाचा भाग आहे -कुठल्याही व्यक्तींना वयाच्या चाळीशीनंतर डोळ्याची काळजी घेणे गरजेचे असते. यामागचे कारण चाळीशीनंतर डोळ्यातील सिलेरिया मसल कमजोर होतात. यालाच वैद्यकीय भाषेत 'प्रिसोबायोपीया' असे म्हणतात. यात वयानुसार डोळ्यांची पाहण्याची क्षमता कमी होते. पूर्वी हा त्रास साधारण चाळीशीनंतर होता होता. पण, सध्याच्या जीवनशैलीत झालेला बदल, मोबाइलच्या सतत वापरामुळे वयाच्या 35 वर्षानंतर काही व्यक्तीमध्ये हे लक्षण दिसत असल्याचे अभ्यासातून पुढे आल्याचे नेत्र विशेषज्ज्ञ रोहित मोटवणी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. तसेच वाहन चालक खासकरुन जे रात्री वाहन चालवतात त्यांना समोरून येणाऱ्या वाहनाच्या तीव्र लाईटमुळेही डोळ्यांचा त्रास होत असल्याचेही डोळ्यांवर याचा परिणाम होतो.