नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख अध्यक्ष असेलेल्या श्रीसाई शिक्षण संस्थेची इडीकडून छापेमारी करत चौकशी करण्यात आली. यामध्ये कोणत्याही शासकीय यंत्रणेला अथवा अधिकाऱ्यांना कारवाईत गैर आढळले नाही, असा खुलासा एका प्रेसरिलीजच्या माध्यमातून संस्थेनेच केला आहे. या माध्यमातून एनआयटी संस्था प्रशासनाने ईडीने चौकशी केल्याचे एक प्रकारे नाकारले असून संस्थेचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नागपूरच्या फेट्री परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे एनआयटी म्हणजे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पस आहे. याच संस्थेच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मनी लॉडरिंग झाल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकारणाची चौकशी ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालायकडून केली जात आहे.
संस्थेत कुठलाही गैरव्यवहार झाला नाही, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या श्रीसाई शिक्षण संस्थेचा दावा - ईडीची छापेमारी
नागपूरच्या फेट्री परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे एनआयटी म्हणजे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पस आहे. याच संस्थेच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मनी लॉडरिंग झाल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकारणाची चौकशी ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालायकडून केली जात आहे. त्यातच त्यांच्या एनआयटी संस्थेत छापेमारी करण्यात आली होती. मात्र संस्थेत कुठलाही गैरव्यवहार झाला नाही, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या श्रीसाई शिक्षण संस्थेचा दावा...
ई़डीची छापेमारी-
याच प्रकरणात 6 ऑगस्ट रोजी ईडीचे एक पथक हे एनआयटी कॉलेज कॅम्पसमध्ये आले होते. या पथकाने जवळपास दोन ते तीन तास चौकशी केली असून काही म्हत्वाचे कागदपत्र तपासल्याचे बोलले जात आहे. पण संस्थेच्यावतीने मात्र कुठलाही गैरव्यवहार झाला नसून संपूर्ण काम पारदर्शक आहे. संस्थेची बदनामी होत असून संस्थेचे समाजातील असल्याने प्रतिमेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दावा करण्यात आला आहे. यासोबतच संस्थेतील खाती जमाखर्च लेखिपरिक्षण झाले आहे. हा सर्व जमाखर्च धर्मदाय आयुक्त, आयकर अधिकाऱ्यांनी तपासले आहे. यात शासकीय यंत्रणेला कुठलेली गैरव्यवहार झाले नसल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे.
100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापू्र्वी ईडीने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या घरांवर छापेमारी करून 4 कोटींची संपत्तीही जप्त केली आहे. तसेच त्यांना आतापर्यंत 5 वेळा चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. तसेच ईडीकडून अनिल देशमुखांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तेमर छापेमारी सुरूच आहे.