नागपूर - शहराची जनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या शहर वाहतूक सेवेतील आपली बस सेवा तब्बल 17 टक्क्यांनी महागली आहे. इंधनाचे दर बऱ्यापैकी कमी झाले असताना शहर वाहतुक बस सेवेचे तिकीट दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढला आहे. इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे कारण देत आपल्या बसच्या प्रवासी भाड्यात 17 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यापुढे 2019 मध्ये सुद्धा प्रवासी भाड्यात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. नागपूर महानगरपालिकेतर्फे चालविण्यात ( Nagpur Municipal Corporation Aapali bus service ) येणाऱ्या आपल्या बस सेवेचा दर महिन्याचा खर्च हा सहा कोटी होता. मात्र इंधन दरवाढ आणि सुट्या भागाच्या किमती वाढल्याने हा खर्च सात ते आठ कोटीं रुपायांवर गेला आहे. त्यामुळे तिकिटांचे दर तब्बल 17 टक्क्यांनी वाढवण्यात आले असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे प्रशासन, आयुक्त राधाकृष्णन बी. ( Commissioner Radhakrishnan b ) यांनी दिली आहे.
नागपूर महानगर पालिकेतर्फे तिकिटांचे दर वाढवण्यात यावे या करिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मंजुरी दिल्यानंतर आपली बस सेवेचे टिकीट 17 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. इंधन आणि सुटे भागांच्या वाढत्या किमतीमुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तिकिटांचे दरवाढ झाल्यानंतर आपली बस प्रवासाचे किमान भाडे आता बारा रुपये झाले आहे. आतापर्यंत किमान दोन किलोमीटर प्रवासाचे भाडे दहा रुपये आकारले जात होते.