नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास नागपूर विमानतळावर घडली. उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड लक्षात आल्याने वैमानिकाने विमानाचे उड्डाण थांबवले. विमानात प्रवास करत असलेले गडकरींसह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
नागपुरात गडकरींच्या विमानात तांत्रिक बिघाड, उड्डाण रद्द - नितीन गडकरींच्या विमानात तांत्रिक बिघाड
नितीन गडकरींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान कंपनीने हे उड्डाण रद्द केले आहे.
![नागपुरात गडकरींच्या विमानात तांत्रिक बिघाड, उड्डाण रद्द](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4120545-thumbnail-3x2-air.jpg)
इंडिगो विमान
इंडिगोच्या विमानाने गडकरी नागपूरवरुन दिल्लीला जायला निघाले. मात्र, उड्डाणापूर्वीच विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले . त्यानंतर त्याने धावपट्टीवरुन उड्डाणपूर्वीच विमान परत घेतले. यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने गडकरी नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत.
Last Updated : Aug 13, 2019, 12:01 PM IST