नागपूर - वेकोलीने ( Nitin Gadkari comment on wcl ) कोळशाचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. प्रशासनाने 4-4 वर्षे फाईल, पत्र दाबून ठेवणे बंद करावे. जर असे झाले नसते तर सहा महिन्यांपूर्वीच कोळशाचे उत्पादन वाढले असते आणि कोळशाचा ( Wcl coal manufature ) तुटवडा जाणवला नसता. वेकोलीने स्वस्त कोळसा दिल्यामुळेच गरिबांना स्वस्त वीज मिळत आहे. मात्र, या कोळशात दगडही विकले जातात. नाशिक-कोराडीत प्रकल्पात दगड हे स्मारकाच्या स्वरुपात पाहायला मिळतात, असे टोलाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari comment on Coal manufature ) यांनी मारला. ते दिव्यांगासाठी साहित्य वाटप शिबिरात बोलत होते. वेकोलीच्या सीएसआर फंडातून साहित्य वाटप करण्यात आले.
वेस्टर्न कोल फिल्ड्सने आपल्या खाणींमधून युद्धस्तरावर काम करून सुमारे 20 दशलक्ष टन कोळसा उत्पादन वाढवणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. वेकोलीने वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा राखीव ठेवाला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी कोळसा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी खाणी सुरू केल्या पाहिजे. नुकतेच केंद्रीय ऊर्जामंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या कोळसा खाणी बंद आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहेत त्या कोळसा खाणी सुरू करण्यासाठी खाजगीकरणाचा वापर करून पाहावा, असे गडकरी म्हणाले. तसेच कोळशाची कॅलरीक व्हॅल्यू कमी असते, त्यामुळे ग्रेडेशन पद्धतीतील तपासणी दोष असल्याचेही गडकरी म्हणाले. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणालेत.