महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 6, 2022, 5:44 PM IST

Updated : Mar 6, 2022, 7:05 PM IST

ETV Bharat / city

Nagpur Cable Bus : उपराजधानीत लवकरच येणार हवेतून चालणारी बस, नितीन गडकरींची घोषणा

पुण्याला आज मेट्रोरेलची ( Pune Metro ) भेट मिळाली असताना उपराजधानी नागपूरात भविष्यात हवाई पण केबलच्या मदतीने बस धावणार असल्याची भेट मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच नागपुरात हवेतून चालणारी केबलबस ( Cable Bus In Nagpur ) सुरु करण्याचा सूतोवाच केला आहे.

Nagpur Cable Bus
Nagpur Cable Bus

नागपूर -पुण्याला आज मेट्रोरेलची ( Pune Metro ) भेट मिळाली असताना उपराजधानी नागपूरात भविष्यात हवाई पण केबलच्या मदतीने बस धावणार असल्याची भेट मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच नागपुरात हवेतून चालणारी केबलबस ( Cable Bus In Nagpur ) सुरु करण्याचा सूतोवाच केला आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे निर्देशही गडकरींनी दिल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया

काय म्हणाले नितीन गडकरी -

नागपूरात सूक्ष्म व लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच 12 मार्च ते 14 मार्च दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्टार्ट अप ऑटोमोबाईल सेक्टर फुड प्रोसेसिंग एनेर्जी सेक्टर या विविध विषयावर तीन दिवसाचे या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ हे तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी मार्गदर्शन करतील. जेणेकरून विदर्भातील लघुउद्योगांना तसेच युवकांना नवीन रोजगार आणि उद्योग संदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेबाबत मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपुरात ही हवेतून चालणारी बस अर्थात केबल बस सुरू करणार असल्याचे जाहीर केले. 35 ते 40 सीटर ही केबल सध्या बस फिलिपिन्समध्ये चालवली जात असून त्याच धर्तीवर नागपुरात ही केबल बस सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले. नागपुरात केबल बस पारडीहून रिंगरोड मार्गे लंडन स्ट्रीटपर्यंत जाईल. तिथून हिंगणा टी पॉईंट, डिफेन्स वरून वाडी आणि तिथून व्हेरायटी चौकापर्यंत जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -Uncut PM Modi : पूर्वी भूमीपूजन व्हायची, उद्घाटनांचा पत्ता नव्हता; पंतप्रधानांचा मेट्रो उद्घाटन प्रसंगी टोला

Last Updated : Mar 6, 2022, 7:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details