महाराष्ट्र

maharashtra

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या जवळ

By

Published : Jul 4, 2020, 10:32 AM IST

Updated : Jul 4, 2020, 10:37 AM IST

११ जून ते २६ जून दरम्यान तुरुंग प्रशासनातील जे अधिकारी आणि कर्मचारी कारागृहाच्या आत होते. त्यापैकी एक कर्मचारी कारागृहातून बाहेर आल्यानंतर कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते,त्यानंतर कारागृहात तैनात असलेले उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतिदिन कोरोना चाचणी केली जात असून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ९६ झाला आहे.

central jail
नागपूर कारागृहात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या जवळ

नागपूर- सलग तीन महिने कोरोनाच्या विषाणूंपासून अलिप्त राहिलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोना अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये कारागृहात कामाला असणारे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीय कोरोनाबाधित होण्याची संख्या ९६ झाली आहे. २५ जूनला कारागृहातील एका कर्मचाऱ्यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करुन त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. ज्याचा अवहाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले बंदिवान, इतर सहकारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तब्बल ९६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या जवळ

सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सोडललेल्या साडेसातशे कैद्यानंतर ही कारागृहात सुमारे अठराशे कैदी कैद आहेत. याच कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी दोन टीम्स मध्ये विभागून प्रत्येकी पंधरा दिवस कारागृहाच्या आत आणि पुढील पंधरा दिवस क्वारंटाईन अशा स्वरूपात काम करत आहे. ११ जून ते २६ जून दरम्यान तुरुंग प्रशासनातील जे अधिकारी आणि कर्मचारी कारागृहाच्या आत होते. त्यापैकी एक कर्मचारी कारागृहातून बाहेर आल्यानंतर कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते,त्यानंतर कारागृहात तैनात असलेले उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतिदिन कोरोना चाचणी केली जात असून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ९६ झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्यामुळे कारागृहाच्या आतील इतर कैद्यांना ही संक्रमण तर झाला नसावा ना अशी शंका निर्माण झाली आहे.

Last Updated : Jul 4, 2020, 10:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details