नागपूर- २३ वर्षीय निकिता चौधरी संशयास्पद मृत्यू प्रकरणात अखेर नागपूर पोलिसांनी निकिताचा अत्यंत जवळचा मित्र असलेल्या राहुल बांगरे विरुद्ध निकिताला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 14 मार्च रोजी निकिता बेपत्ता झाली होती, त्यानंतर 16 मार्चला रात्रीच्या वेळी निकिताचा अर्धवट जळालेला मृतदेह वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी या भागातील निर्जन स्थळी आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर निकिताची हत्या झाली नसून तिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र पोलिसांनी मांडलेल्या थेअरीवर निकिताच्या कुटुंबीयांना विश्वास बसला नाही. निकितावर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी निकिताचा मित्र राहुल बांगरे निकिताला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
घटनाक्रम- १४ मार्च रोजी निकिता बेपत्ता झाली होती. त्यानंतर १६ मार्चच्या रात्री वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती मार्गावरील सुराबर्डी परिसराच्या एका निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला होता. निकिताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे प्रथमदर्शनी तिची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे निकिताची हत्या झाली नसून, तिने स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. पोलीस अजूनही त्यांच्या दाव्यावर कायम आहेत