महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कोरेगाव-भीमा प्रकरणी एनआयए चौकशीचे केंद्राचे पत्र मिळाल्यानंतर पुढील पाऊल उचलणार' - koregaon bhima nia

कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी 'एनआयए'च्या हातात सोपवण्याआधी केंद्र सरकारने राज्य सरकारसोबत चर्चा करायला हवी होती. राज्याला विश्वासात न घेता केंद्राने हा निर्णय घेतला, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Home Minister Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Jan 30, 2020, 4:57 PM IST

नागपूर - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राज्य पोलीस करत असताना हा तपास केंद्र सरकारने राज्याला विश्वासात न घेता एनआयएकडे दिला. यााबाबत केंद्राचे पत्र आज (गुरूवारी) सायंकाळपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आपण मुख्यंत्र्यांशी चर्चा करुन आणि कायदेशीर सल्ला घेऊन पुढे पाऊल उचलणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... मुनगंटीवार स्वप्न पाहतायेत... पाहू द्या!

महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी विशेष पथकाद्वारे व्हावी, अशी मागणी शरद पवारांनी केली होती. कोरेगाव हिंसाचाराराचा तपास विशेष चौकशी पथकाद्वारे सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकताच, केंद्राने एनआयएकडून तपास करण्याची घुरकोडी केली.

हेही वाचा... युवराज आता 'म्हातारीचा बुट' हवाय म्हणून बालहट्ट करतील...

याबाबत बोलताना देशमुख यांनी, कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी 'एनआयए'च्या हातात सोपवण्याआधी केंद्र सरकारने राज्य सरकारसोबत चर्चा करायला हवी होती. राज्याला विश्वासात न घेता केंद्राने हा निर्णय घेतला, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details