महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांना कोरोना; शपथविधीवेळी मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांच्या संपर्कात - आमदार अभिजीत वंजारी यांना कोरोना

राज्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अभिजीत वंजारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

mla of graduate constituency
पदवीधर आमदार अभिजीत वंजारी

By

Published : Dec 13, 2020, 10:36 AM IST

नागपूर- पदवीधर निवडणुकीत नागपूर विभाागतून नुकतेच विजयी झालेले आमदार अभिजीत वंजारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहीती त्यांनी स्वतः समाज माध्यमातून दिली आहे. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःची कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहनही वंजारी यांनी केले आहे. विशेष म्हणजे नुकतेच त्यांनी मुंबईत जावून शपथविधी पूर्ण केली आहे. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही नेत्यांच्या संपर्कात ते आले होते. त्यामुळे इतरसाठी ही बाब चिंताजनक ठरत आहे.

दोन्ही उमेदवारांना झाली कोरोनाची लागण-

विशेष म्हणजे पदवीधर निवडणूकीत उमेदवार राहिलेले संदिप जोशी यांनाही नुकतेच कोरोनाची लागण झाली आहे. अशावेळी आता अभिजीत वंजारी यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच चर्चा रंगल्याचे पहायला मिळत आहे.

प्रचारा दरम्यान लागण? इतरांनाही चाचणी करण्याचे आवाहन-

नुकतीची राज्यात पदवीधर निवडणूक पार पडली आहे. यात नागपूर पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार म्हणून अभिजीत वंजारी हे निवडून आले आहे. गेली अनेक दिवसापासून ते प्रचारासाठी सर्वत्र फिरत होते. अनेक नागरिकांच्या भेटी घेत होते. या दरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. अशावेळी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच ते होम आयसोलेट झाल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. शिवाय संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोव्हिड चाचणी करू घ्यावे. असे आवाहनही आमदार अभिजीत वंजारी यांनी केले आहे.

हे दिग्गज नेतेही संपर्कात आले होते-

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शपथविधीकरिता त्यांना मुंबईला जावे लागले. यावेळी ते अनेक दिग्गज नेत्यांच्याही संपर्कात आले होते. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे या नेत्यांसाठी ही धक्कादायक बाब समजली जात आहे.

५८ वर्षानंतर पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा रोवला-

अभिजीत वंजारी हे नागपूर पदवीधर विभागात भाजप उमेदवार संदिप जोशी यांचा दारून पराभव केला होता. संदिप जोशी यांना त्यांच्याच गडावर हरविल्याने या निवडणुकीत मोठी चूरस पाहायला मिळाली. तसेच तब्बल ५८ वर्षानंतर काँग्रेसला नागपूर पदवीधर मतदारसंघ आपल्या कोट्यात अभिजीत वंजारीच्या रूपाने आणता आले. त्यामुळे त्यांचा हा विजय सर्वच अंगाने महत्वाचा मानला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details