नागपूर -नागपुरात पॉझिटिव्हिटी दर हा 1 टक्क्यांच्या आत आहे. यात नागपूर लेव्हल एकमध्ये आल्याने शिथिलता मिळायला सुरूवात झाली होती. तेच डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या धोक्याने पुन्हा लेव्हल 3 मध्ये जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. यामुळे अत्यावश्यक सेवा आणि इतर दुकाने हे 8 वाजेपर्यंत सुरू होऊन आठवडा पूर्ण होताच पुन्हा 4 वाजेपर्यंतचे निर्बंध लागू करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या अनुषंगाने सोमवारपासून निर्बंध लागू होणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने हे आठवडाभर सुरू राहणार असून त्यांना चार वाजेपर्यंतची वेळ मर्यादा देण्यात आली आहे. अत्यावश्यक नसलेल्या दुकान सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत खुले राहणार असून विकेंडला बंद असणार आहे. यात नव्या नियमात सुद्धा रेस्टॉरंट आणि बार विकेंडला बंद असणार आहे.
स्पोर्ट ऍक्टिव्हिटीला 'या' वेळेत मुभा
नागपुरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवडाभर राहणार सुरू, जाणून घ्या नवी नियमावली - नागपूर लॉकडाऊन
तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या अनुषंगाने सोमवारपासून निर्बंध लागू होणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने हे आठवडाभर सुरू राहणार असून त्यांना चार वाजेपर्यंतची वेळ मर्यादा देण्यात आली आहे. अत्यावश्यक नसलेल्या दुकान सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत खुले राहणार असून विकेंडला बंद असणार आहे.
सलून, जिम, ब्युटी पार्लर दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, परंतू यामध्ये या दुकानात एसी नसावा अशी अट घालण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी पूर्व वेळ घेऊन जावे, असे सूचित करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून बैठक, आमसभा ऑनलाइन घ्याव्या लागणार आहे. यात खरिपाचा हंगाम सुरू होणार असून कृषी सेवा केंद्र चार वाजेपर्यंत आठवडाभर सुरू राहील. सार्वजनिक बस सेवा 100% क्षमतेने परंतू उभ्याने प्रवासी घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. धार्मिक स्थळे स्विमिंग पूल हे बंद असतील. लग्नसमारंभासाठी पन्नास लोकांची उपस्थिती कायम असेल तसेच अंतिम संस्काराला वीस लोकांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी असणार आहे. खाजगी कोचिंग क्लासेस पुन्हा बंद करण्यात आले असून ऑनलाइन अभ्यासक्रमांना मात्र मुभा राहील, ग्रंथालय अभ्यासीका चार वाजेपर्यंत सुरू राहतील. पर्यटनाला असणार मुभा देण्यात आली आहे.