नागपूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ६२५ झाली आहे. गेल्या २४ तासात २५ संशयितांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १३ झाला आहे. याशिवाय १२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
उपराजधानीत कोरोना रुग्णांच्या संख्येत २५ ने वाढ, तर बारा रुग्णांची कोरोनावर मात - कोरोना पेशंट नागपूर
नागपुरात गेल्या २४ तासात २५ संशयितांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १३ झाला आहे.
नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसात नागपुरात तब्बल सव्वाशे पेक्षा जास्त संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या तब्बल ६२५ इतकी झाली आहे. आज दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक रुग्ण मध्यप्रदेशच्या सागर येथील आहेत. तर दुसरा रुग्ण अमरावती येथील रहिवाशी आहे. त्यामुळे नागपुरात कोरोनाबाधित मृतांची संख्या १३ झाली आहे. याशिवाय आज १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.