मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave of Corona Mumbai ) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. आज गुरूवारी २५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवार, बुधवार या दोन दिवसात शून्य मृत्यूची नोंद झाली होती, आज गुरूवारी पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी तर आतापर्यंत एकूण १२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २४०७ सक्रिय रुग्ण आहेत.
- २५९ नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१७ फेब्रुवारीला) २५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५४ हजार ९९१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३३ हजार ४९७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९४५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २४०७ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०३ टक्के इतका आहे.
- ९७.६ टक्के बेड रिक्त
मुंबईत आज आढळून आलेल्या २५९ रुग्णांपैकी २३५ म्हणजेच ९१ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ७ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,४१९ बेडस असून त्यापैकी ८५८ बेडवर म्हणजेच २.४ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९७.६ टक्के बेड रिक्त आहेत.
- रुग्णसंख्या घटतेय