महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिंताजनक..! गेल्या 24 तासात नागपुरात एकूण 87 रुग्णांची वाढ - corona nagpur

संध्याकाळपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. २४ तासात नागपुरात ८७ कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने एकूण रुग्ण संख्या 230 झाली आहे.

87 रुग्णांची वाढ
87 रुग्णांची वाढ

By

Published : May 7, 2020, 4:05 PM IST

नागपूर - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळपासून तब्बल ४३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. काल रात्री 44 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते, त्यामुळे गेल्या 24 तासात एकूण 87 रुग्णांची वाढ झाली आहे.

संध्याकाळपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. २४ तासात नागपुरात ८७ कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने एकूण रुग्ण संख्या 230 झाली आहे. बुधवारी रात्री आणि आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण आधीच विलगीकरणात होते. यापैकी बहुतांशी नागपुरातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉट सतरंजीपुरामधील आहेत. नागपुरात १०० रुग्ण संख्या पोहचायला ४४ दिवस लागले होते आणि पुढील १०० चा आकडा गाठायला केवळ ४ दिवसांचा कालावधी लागलेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details