महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात रविवारी ८३ कोरोनाबाधित रुग्णांची भर, ८९ रुग्णांना डिस्चार्ज - नागपूर कोरोना न्यूज

नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३.५६ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा १.७९ इतका आहे.

corona
कोरोना

By

Published : Jul 20, 2020, 1:53 AM IST

नागपूर- रविवारी दिवसभरात नागपूर शहरात ८३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९६९ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रसासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी ८९ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८८१ इतकी झाली आहे. या शिवाय रविवारी पुन्हा सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नागपुरात एकूण ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे ५३ पैकी ३६ मृत्यू हे नागपुर जिल्ह्यातील आहेत, तर १७ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सध्या नागपुरातील ७ ठिकाणी ९६१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेयो) २१० तर शासकीय वैद्यकीय रुग्णांलयात (मेडीकल)१९९, एम्समध्ये ५५, कामठी येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये २७ आणि खासगी रुग्णालयात २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १२४ आणि आमदार निवासमध्ये ३१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३.५६ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा १.७९ इतका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details