नागपूर- नागपूरात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. शनिवारी आलेल्या अहवालात 79 जण दगावले आहेत. तर 6 हजार 959 कोरोनाबाधित आढळून आले आहेत.तेच पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मृतांची संख्या 135 वर जाऊन पोहोचली आहे.
जिल्ह्यात 29 हजार 53 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शहरात 4 हजार 503 बाधित मिळून आले आहेत. 2 हजार 447 कोरोनाबाधित मिळून आले आहेत. यात शहरात 40, ग्रामीण 33, आणि बाहेर जिल्ह्यातील 6 जणांचा मृत्यूने पुन्हा भर पडली आहे. आजपर्यंत 6,188 बधितांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी 5 हजार 4 जण हे कोरोनातून बरे झाले आहे. तर आजपर्यंत 3 लाख 15 हजार 999 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
नागपुरात 6 हजार 959 नवे कोरोनाबाधित; 79 जणांचा मृत्यू - Nagpur corona patients recovery rate
जिल्ह्यात 29 हजार 53 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शहरात 4 हजार 503 बाधित मिळून आले आहेत.
![नागपुरात 6 हजार 959 नवे कोरोनाबाधित; 79 जणांचा मृत्यू Nagpur corona update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11444735-357-11444735-1618700309880.jpg)
हेही वाचा-महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या, आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे. यात नागपूरमध्ये 6 हजार 959 बाधितांची नोंद झाली. भंडारा 1240, चंद्रपूर 1593, गोंदिया 881, वर्धा 816, गडचिरोलीमध्ये 307, तर आज सहा जिल्ह्यात 11796 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. 135 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. 7, 898 हे कोरोनातून बरेसुद्धा झाले आहेत.
हेही वाचा-कोव्हिड रुग्णांना नातेवाईकांकडून नारळामधून दारू, टरबुजातून तंबाखू देण्याचा प्रयत्न
नागपूर जिल्हा 17 एप्रिलच्या आकडेवारीनुसार कोरोना अपडेट
- नव्याने कोरोना बाधित 6 हजार 959
- कोरोना मुक्त झालेले 5004
- आज कोरोनामुळे झालेले मृत्यू 79( शहरात 40, ग्रामीण 33, जिल्ह्याबाहेर 6)
- कोरोना चाचण्या -29 हजार 53
- एक्टिव्ह कोरोना रुग्ण- 66 हजार 208