नागपूरनागपूर-मुंबई रेल्वे लाईनवर गुरुवारी सकाळी धावत्या रेल्वे गाडीसमोर तरुण आणि तरुणीने आत्महत्या Nagpur couple suicide केली केल्याची घटना घडली होती. मृत अनोळखी असल्याने त्यांच्या आत्महत्या मागील कारणांचा शोध पोलिसांनी Nagpur crime news सुरू केला होता. दोनही मृतकांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मृत तरुण हा जितेंद्र कांशीराम नेवारे असून तो नागपूरच्या बाबा फरीद नगर, येथील रहिवासी आहे. तर तरुणी ही स्वाती पप्पू बोपचे असून ती गोंदियाची रहिवासी आहे. दोघेही नात्यातच आहेत.
जितेंद्र हा विवाहित असून वर्षभरापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. तो आईसोबत एकटाच राहत होता. स्वाती ही नात्याने त्याची पुतणी लागत होती. त्यामुळे ती कधी कधी पाहुणी म्हणून त्याच्या घरी येऊन राहत होती. त्यातून दोघांमध्ये प्रेम जळले. परंतु आपल्या नात्याला मान्यता मिळणार नाही म्हणून दोघांनी रेल्वेखाली येऊन Nephew and uncle suicide in Nagpur आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.