नागपूर - जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. यातच नागपूर जिल्ह्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मंगळवारी नागपूर शहरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 691 हे नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. सोमवारच्या तुलनेत 19 रुग्ण कमी होते.
उपराजधानीत कोरोनाच्या रुग्ण संख्येत भर सुरूच; तिसऱ्या दिवशीही 8 बळी - नागपुरात कोरोनाचे बळी
प्रशासनाच्या वतीने कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला सुरुवात झाली आहे. यात नागपूरच्या शहरी भागात 5, ग्रामीण भागात 1 तर, बाहेर जिल्ह्यातील 2 असे 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 4291 जणांचा नागपुरात मृत्यू झाल्याची नोंद आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला सुरुवात झाली आहे. यात नागपूरच्या शहरी भागात 5, ग्रामीण भागात 1 तर, बाहेर जिल्ह्यातील 2 असे 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 4291 जणांचा नागपुरात मृत्यू झाल्याची नोंद आहे. नागपूर जिल्ह्यात 6468 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. यात तेच ग्रामीण भागात 1178 रुग्ण तर नागपूर शहरात 5290 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.