नागपूर -उपराजधानी नागपुरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने राष्ट्रीय रक्षा अकादमी आणि नैसेना अकादमीची परीक्षा घेण्यात आली. शहरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात आली.
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत नागपुरात एनडीएची परीक्षा परीक्षा केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन
नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत देखील कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत परीक्षेसाठी केंद्रात प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचे करण्यात आले होते, तसेच योग्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि कोरोनाच्या इतर नियमांचे पालन करत ही परीक्षा पार पडली. ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली. दरम्यान सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध घालण्यात आल्याने, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली.
हेही वाचा -'साठेबाजाला वाचवण्यासाठी भाजप नेते जातात, याचा अर्थ काहीतरी काळंबेर आहे