नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयातही जाणार आहेत. पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे.
भाजप सरकारच्या विरोधात नागपुरात निदर्शने - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
शरद पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे. भाजप सरकारच्या विरोधात नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा - मुले पळवण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; मुंबई पोलिसांचे आवाहन
याचे पडसाद नागपुरात देखील उमटले. भाजप सरकारच्या विरोधात नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार स्वतः पुढाकार घेत आहेत. त्यांना जनता भरभरून प्रतिसाद देत आहे. त्यामुळे त्यांच्या वर खोटे आरोप करून भाजप सरकारने ईडीला हाताला धरुन गुन्हा दाखल केला आहे. भाजप सरकार सुडाचे राजकारण करत आहे, असे मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.