नागपूर -आज पहाटे नाशिक जवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात अकरा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला ( Bus Caught Fire in Nashik ) आहे.या प्रकरणाचीराज्य सरकारच्या वतीने चौकशी सुरू झाली आहे, चौकशीनंतर खरे कारण समोर येईल. जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कार्य करत आहे. घडलेला अपघात ही अतिशय दुःखद बाब आहे. जे गेले आहे, त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आपण सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. असे यावेळी (NCP President Sharad Pawar visit to Nagpur) शरद पवार म्हणाले. आज (expressed his views on various issues today) नागपूर येथे बोलतांना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.
निवडणूक आयोगाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा -धनुष्यबाण कुणाचा? या विषयावर आज निवडणुक आयोग निकाल देणार आहे. हा निकाल कोणाच्या बाजुने लागेल असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता, ते म्हणाले की, मला त्यात काही सांगण्याच कारण नाही. निवडणूक आयोग या संदर्भातला निर्णय घेईल. आलेला निर्णय राजकीय पक्षांनी मान्य केला पाहिजे.