नागपूर -शहरातील वारांगनाची वस्ती म्हणून ओळख असलेल्या गंगा जमुना या ठिकाणी असलेल्या एका इमारतीत दोन भुयार सापडले असल्याचा दावा शुक्रवारी (दि. 29) लकडगंज पोलिसांनी केला आहे. लहान मुलींना लपवण्यासाठी या भुयारांचा उपयोग केला जायचा, असा दावा खुलासा पोलिसांनी केला होता. त्यानंतर शनिवारी (दि. 30) वारांगनाच्या हक्कांसाठी पोलिसांच्या विरोधात लढा देत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे यांनी पोलिसांच्या या दाव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी खुलासा केल्याप्रमाणे त्यांनी दोन भुयारी मार्ग शोधले आहेत तर ते भुयार जमिनीच्या आत असायला हवे होते, असे भुयार प्रत्येकाच्या घरात असू शकतात, असे त्या म्हणाल्या. ज्या अल्पवयीन मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी ते भुयार शोधले आहेत, त्यावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
लकडगंज पोलिसांनी राजस्थान येथील पूर्व इतिहास असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या माहितीवरून भुयार शोधण्याची कारवाई केली होती. ज्यानंतर आज ज्वाला धोटे यांनी भर पत्रकार परिषदेत लकडगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक पराग पोटे आणि शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यावर आरोप केले आहेत. गंगाजमुनाची जागा भाजप समर्थित बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालायची असल्याने हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.
काय आहे प्रकरण