नागपूर -अमरावती येथे झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. एका विशिष्ट पक्षाचा त्यात सहभाग असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात एक अहवाल देखील पुढे आलेला आहे. मात्र, मला त्या संदर्भात फारशी माहिती नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP Chief Sharad Pawar) यांनी केला आहे.
आजपासून शरद पवार यांच्या विदर्भ दौऱ्याला(Sharad Pawar Vidarbha Daura) नागपूरमधून सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्रिपुरा(Tripura Violence) येथे घडलेल्या घटनेची रिऍक्शन महाराष्ट्रात का उमटली हे देखील तपासणे गरजेचे आहे. यामागे षडयंत्र आहे का? याचा सखोल तपास करण्याची सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली असल्याची माहिती शरद पवार(Sharad Pawar on Amravati Violence) यांनी दिली आहे.
- निवडणुकांमध्ये फायद्यासाठी दंगली - शरद पवार
त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे राजकारण सुरू आहे. केवळ निवडणुकांमध्ये फायदा घेण्याच्या उद्देशानेच अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे दंगली भडकवण्यात आल्या असल्याची माहिती असल्याचे देखील शरद पवार म्हणाले आहेत. रझा अकॅडमीवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे संपूर्ण बाजू तपासल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
- सत्ता गेल्याने फडणवीस अस्वस्थ -
राज्यात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांची अस्वस्थता वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यातून त्यांची अस्वस्थता खूप वाढली असल्याचे दिसत आहे, असा टोला शरद पवार यांनी फडणवीस यांना लावला आहे. एखाद्या संवेदनशील प्रकरणावर बोलताना त्यांनी संयम बाळगणे गरजेचे असल्याचा सल्ला पवार यांनी फडणवीस यांना दिला आहे.
- अनिल देशमुख यांच्यावर अन्याय -