नागपूर - राष्ट्रवादीकडून नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करत पुतळा दहन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. तीन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर भाजप युवा मोर्चाने पुतळा जाळून राजीनाम्याची मागणी केली होती.
नागपुरातील बहुचर्चित हत्याकांड आर्किटेक एकनाथ निमगडे प्रकरणाचा छडा पाच वर्षांनी लागला. निमगडे यांची हत्या 100 कोटीचा जमिनीच्या वादातुन 5 कोटींची सुपारी देऊन करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारी सकाळी वाजताच्या सुमारास राष्ट्रवादीचे पदाधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा, असे फलक हातात घेण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन, निमगडे प्रकरणात चौकशीची मागणी - देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन
राष्ट्रवादीकडून नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करत पुतळा दहन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळी खासगी पीए असलेल्या कुमार मसराम याने एकनाथ निमगडे यांची जागा खरेदी करायची असल्याची मागणी केली होती. ही जागा मुख्यमंत्री फडणवीस याना पाहिजे होती, असाही आरोप राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी जागा विकण्यास नकार दिला होता. त्यानंतर असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्यानंतर त्याची हत्या झाली. या हत्येतील आरोपी रणजित सफेलकर हा भाजपच्या नेत्याच्या जवळचा आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नसलेले कुमार मसराम यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
हे ही वाचा - मंगळवारी राज्यात 28 हजार 699 कोरोनाबाधितांची नोंद, 132 जणांचा मृत्यू
भाजपयुमोने केले होते आंदोलन -
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा आरोपा नंतर भाजपाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर भाजपयुमोच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी गृहमंत्री यांचा पुतळा त्यांच्या घरासमोर जाळण्यात आला. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधी पक्षनेते यांच्या घरासमोर आंदोलन किंवा अन्य प्रकार घडू नये, म्हणून सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. यात आज राष्ट्रवादीच्या लोकांकडून हे आंदोलन करण्यात आले.