महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

२० टक्के अपघात कमी करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बातमी

देशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २० टक्के रस्त्यांवरील अपघात कमी करण्यात यश आले आहे. ५ टक्के मृत्यूदरही नियंत्रिण आणण्यात आला असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

nitin gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By

Published : Dec 9, 2020, 7:10 PM IST

Updated : Dec 9, 2020, 8:04 PM IST

नागपूर - देशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २० टक्के रस्त्यांवरील अपघात कमी करण्यात यश आले आहे. ५ टक्के मृत्यूदरही नियंत्रिण आणण्यात आला असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. अपघात आणि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचे, सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते जागतिक बँकेतर्फे रस्ते सुरक्षा निरीक्षण या विषयावर एका परिषदेत बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अपघातांचे प्रमाण घटले -

देशात ११ टक्के रस्ते अपघात होत असून, अपघातांमुळे ३.१५ टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे नुकसान होत आहे. रस्ते अपघात आणि अपघात होणार्‍या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असून यासाठी कायद्यातही बदल करण्यात आले आहेत. तसेच आवश्यक तेथे कठोर कारवाईही करण्यात येते. रस्ते सुरक्षा समिती आणि अपघात स्थळांची शोध मोहीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने हाती घेतली आहे. रस्ते अपघात होऊ नयेत, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. यामुळे जनजागृती निर्माण होऊन अपघातांचे आणि अपघात मृत्यूचे प्रमाण बर्‍याचअंशी कमी झाले आहे.

तामिळनाडूमध्ये रस्ते अपघात २५ टक्क्यांनी घटले

तामिळनाडू राज्याने जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्याने विविध उपाययोजना करून 25 टक्के अपघातांवर नियंत्रण मिळवले असून, 25 टक्के मृत्यू दर कमी करण्यात यश मिळवले आहे. तामिळनाडूने केलेल्या उपाययोजना अन्य राज्य सरकारांनी केल्या तर अपघात आणि अपघातातील मृत्यूचा दर कमी होऊ शकतो, असे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग आणि शहरातील मार्ग या रस्त्यावरील अपघातस्थळांचे निर्मूलन करण्याची मोहीम सुरु आहे. आतापर्यंत अपघातस्थळे निर्मूलनासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून लोकांचे जीवन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून अपघात रोखण्याच्या उपाययोजना यशस्वी राबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गंभीर आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Last Updated : Dec 9, 2020, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details