महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Student Question CEO : ...अन् 'त्या' चिमुकल्यांनी विचारले मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना प्रश्न - नागपूर सीईओ योगेश कुंभेजकर बातमी

नरखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर ( Nagpur CEO Yogesh Kumbhejkar ) यांची मुलाखत घेत त्यांना प्रश्न विचारले ( Student Question CEO ) आहेत.

Student Question CEO
Student Question CEO

By

Published : Apr 14, 2022, 10:45 PM IST

नागपूर -एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटले की, अनेक जण सरकारी शाळा म्हणून नाक मुरडतात. पण, नरखेड तालुक्यातील थुगाव निपाणी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे कौतुक होत आहे. शाळेच्यामार्फत राबवल्या जात असलेल्या उपक्रमातुन चक्क जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर ( Nagpur CEO Yogesh Kumbhejkar ) यांची मुलाखत घेण्याची संधी त्यांना देण्यात ( Student Question CEO ) आली. यात ही संधी त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी, असेल अशीच काहीशी ठरली.

नागपूर जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. आजच्या घडीला जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शिक्षक आपली जबाबदारी स्वीकारत मुलांची गुणवत्ता वाढीसाठी परीश्रम घेतात. यातीलच थुगाव येथील शाळेकडून एकाहून एक भन्नाट उपक्रम राबवले जात आहेत. यातीलच ग्रेटभेट हा उपक्रम आहे. यामध्ये शाळेतील मुलांना एका मान्यवर व्यक्तिंना प्रश्न विचारून त्यांच्या यशामागील संघर्ष कळावा, तो मुलाखतीच्या माध्यमातून अनुभवता यावा. जेणेकरून मुलांना स्वतःच्या जीवनात काम करण्याचा एक मार्ग मिळेल आणि आयुष्याचे ध्येय गाठण्यास ऊर्जा मिळावी हाच उद्देश ठेवून उपक्रम राबवत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पकडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

मुलांशी दिलखुलासपणे साधला संवाद -या उपक्रमात 23 मुलांनी सहभाग घेतला होता. यापैकी जवळपास 17 मुलांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले. यात सीईओ कुंभेजकर यांनीही दिलखुलास पण विद्यार्थी ते आयटी इंजिनियर होऊन आयएफस, आयपीएस ते आयएएस हा प्रवासाचे क्षण मुलांसमोर मांडले. यात अभ्यास कौशल्य कसे अवगत केले, का आयएएसच व्हावसे वाटले. इंजिनियर आणि बँकिंग क्षेत्रांतही चांगली नोकरी सोडून अधिकारी होऊन काम करण्याचा अनुभव कसा राहिला, यावरही त्यांनी उत्तरे दिली आहे.

चिमुकले अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना

विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर देत समाधान केले - यामध्ये युपीएससीची प्रश्न कठीण असतात. पण, या चिमुकल्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे काही सोपं काम नव्हते, असे म्हणत सीईओ कुंभेजकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा प्रश्नातून आलेल्या शंका आणि त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भावी जीवनात त्यांना लागलेले वेध आणि त्याबद्दल यशाचा मार्ग कसा मिळू शकेल हे सगळे प्रश्न वर्ग ते 3 ते वर्ग 8 च्या विद्यार्थ्यांनी विचारले. त्या प्रश्नाचे सकारात्मक परिणाम होईल, असे उत्तर कुंभेजकर यांनी दिले.

यश मिळवण्यासाठी काय करावे - सीईयो कुंभेजकर यांनीही मुलांना शालेय जीवनाचा अभ्यास आणि खेळ याला महत्व द्यावे. पण, अभ्यास करताना एकाग्रतेने अभ्यास करावा इतर विषयाकडे लक्ष भरकटू देऊ नये, असाही मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

"वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही,"

या कवितेच्या शब्दातून या मुलाखतीचा समारोप विद्यार्थ्यांनी केला. यावर नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ यांनीही मुलांचे आणि शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. एक दिवस नागपूर जिल्ह्याचे नाव उंचावेल, अशी आशा सीईओ कुंभेजकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -Hanuman Chalisa Controversy : राज्यातील हनुमान चालिसा वादाचा कोणाला होईल फायदा? सविस्तर वाचा...

ABOUT THE AUTHOR

...view details