नागपूर -भंडारा-गोंदिया येथील स्थानिक स्वराज्य ( Bhandara Gondia Local Body Election ) संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्भवलेल्या वादानंतर हे प्रकरण आता दिल्ली हायकमांडपर्यंत जाऊन पोहोचले आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. पण हे सरकार राष्ट्रवादी शिवसेना सोबत भाजपला थांबवण्यासाठीच्या विचाराने एकत्र आले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस त्या पद्धतीने वागत नसून चुकीच्या पद्धतीने वागत आहे. ते भाजपला मदत करण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress Leader Nana Patole ) यांनी केला. याची तक्रारही दिल्ली दरबारी हायमकमांड सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Nana Patole Allegation On NCP : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करत असल्याची तक्रार दिल्ली हायकमांडकडे - नाना पटोले - नाना पटोले सोनिया गांधी तक्रार
भंडारा-गोंदिया येथील स्थानिक स्वराज्य ( Bhandara Gondia Local Body Election ) संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्भवलेल्या वादानंतर हे प्रकरण आता दिल्ली हायकमांडपर्यंत जाऊन पोहोचले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस चुकीच्या पद्धतीने वागत असून भाजपला मदत करण्याचे काम करत असल्याचा तक्रार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress Leader Nana Patole ) यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांच्याकडे केली आहे.
'योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल' -भिवंडी येथील महानगरपालिकेत तसेच अमरावती बँकेत त्रास देण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. भंडारा गोंदिया येथे अशा पद्धतीने फोडाफोडीच्या राजकारणाला विकास निधी देताना बीजेपीच्या आमदारांना जास्त पैसे द्यायचे, काँग्रेसच्या आमदारांना नाही, या सगळ्या प्रकारातून बीजेपीला फायदा देण्याचं काम करून सोनिया गांधी यांचा अपमान करण्याचे काम राष्ट्रवादीकडून केले जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. या सगळ्या बाबी हायकमांडपर्यंत पोहचल्या आहेत. या सगळ्या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेईल, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.