नागपूर/भंडारा -बहुजनाचे नेतृत्व महाराष्ट्रात मोठे होत असल्यास, यश मिळत असल्यास अशा चर्चांना समोर जावे लागते. मात्र काँग्रेसच्या विधी न्याय सेलच्या माध्यमातून याची चौकशी केली जाईल. वेळ पडल्यास कोर्टातही जाऊ असा इशारा चित्रा वाघ यांचे नाव न घेता व्हायरल व्हिडिओवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole About Viral Video ) प्रतिक्रिया दिली. ते भंडारा येथून मुंबईला जात असताना माध्यमांशी नागपूर विमानतळावर बोलत होते.
यावेळेस उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही - महाराष्ट्राच्या बहुजनाचा नेतृत्व पुढे येत आहे तेव्हा अशा गोष्टींना समोर जावे लागते. माझी बदनामी करणे, मला त्रास देण्यासाठी व्यक्तिगत स्वरूपाचा आरोप लावण्याचे षड्यंत्र सुरू आहे. निश्चितच या प्रकरणाला आम्ही योग्य पद्धतीने कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ असा इशाराही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रात माझे पुतळे जाळून बदनामी करण्याचा जे काम मागील वेळी झाले. त्यावेळी उत्तर दिले नाही. मात्र यावेळेस उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
मला बदनाम करण्यासाठी केलेले हे कारस्थान - महाराष्ट्र काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चेरापुंजी, मेघालय राज्य येथिल एका हॉटेल मध्ये एका महिलेसोबत खुर्चीवर गळ्यात हात घालून बसला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया विचारले असता मला बदनाम करण्यासाठी केलेले हे कारस्थान असून याविषयी आमच्या सायबर सेल तर्फे कायदेशीर तक्रार देत या प्रकरणाचा सत्यता पुढे आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.